Monday, 5 November 2018

दिपावली ही...


दिपावली ही
आनंदाची रोमहर्षाची
तसेच ती
लहान - मोठांच्या उत्साहाची चैतन्याची ... ।।१।।
दिपावली ही
गोर - गरीबांची
तसेच ती
थोरा -  मोठा श्रीमंताची  ... ।।२।।
दिपावली ही
सर्व धर्म समभावाची
तसेच ती
आपुलकिची आत्मयतेची ... ।।३।।
दिपावली ही
दोन परिवारांच्या नाते संबधांची
तसेच ती
भावा - बहिणीच्या प्रेमाची ... ।।४।।
दिपावली ही
दीप माळेच्या  झगमगाटाची
तसेच ती
लहान - मोठया दीप पणत्यांची ... ।।५।।
दिपावली ही
उंभऱ्या समोरील रांगोळीची
तसेच ती
त्यावरती अलगद पडणाऱ्या दवबिंदूची ... ।।६।।
दिपावली ही
फटाक्यांच्या आतिषबाजीची
तसेच ती
लहान - थोरांच्या आनंदाची ... ।।७।।
दिपावली ही
चविष्ठतेची रुजकर फराळाची
तसेच ती
सम - भावनेच्या शुभेच्छांची ... ।।८।।
                                  - रोहन जयवंत घाडगे 

No comments:

Post a Comment