Saturday, 5 June 2021

पर्यावरण पुरक निसर्ग

आस या निसर्गाला 

प्रदूषण  विरहित पर्यावरणाची 

अन भीती त्यांना 

फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू अन ध्वनी प्रदूषणाची .... 

आस या चांदण्याना 

स्वतःच्या अस्तित्वाची 

अन भीती त्यांना 

झगमगत्या विद्युत प्रकाश्यात लुप्त होण्याची .... 

आस गढ-कोठांना 

स्वतःच्या अस्तित्वाची 

अन भीती त्यांना

त्यांच्या होणाऱ्या पडझडीची अन इतिहासाच्या पानात लुप्त होण्याची .... 

आस या वन्य प्राणी- पक्षी वेलींना 

स्वतःच्या अस्तित्वाची 

अन भीती त्यांना

जंगलामध्ये मनुष्याचा होणाऱ्या सततच्या हल्यात लुप्त होण्याची .... 

आस मला 

सर्वांनी आपापली जबाबदारी स्वीकारण्याची 

अन आपण सर्वांनी मिळुन 

पर्यावरण पुरक निसर्गाकडे वाटचाल करण्याची ....

                                                                - रोहन जयवंत घाडगे 

Monday, 5 November 2018

दिपावली ही...


दिपावली ही
आनंदाची रोमहर्षाची
तसेच ती
लहान - मोठांच्या उत्साहाची चैतन्याची ... ।।१।।
दिपावली ही
गोर - गरीबांची
तसेच ती
थोरा -  मोठा श्रीमंताची  ... ।।२।।
दिपावली ही
सर्व धर्म समभावाची
तसेच ती
आपुलकिची आत्मयतेची ... ।।३।।
दिपावली ही
दोन परिवारांच्या नाते संबधांची
तसेच ती
भावा - बहिणीच्या प्रेमाची ... ।।४।।
दिपावली ही
दीप माळेच्या  झगमगाटाची
तसेच ती
लहान - मोठया दीप पणत्यांची ... ।।५।।
दिपावली ही
उंभऱ्या समोरील रांगोळीची
तसेच ती
त्यावरती अलगद पडणाऱ्या दवबिंदूची ... ।।६।।
दिपावली ही
फटाक्यांच्या आतिषबाजीची
तसेच ती
लहान - थोरांच्या आनंदाची ... ।।७।।
दिपावली ही
चविष्ठतेची रुजकर फराळाची
तसेच ती
सम - भावनेच्या शुभेच्छांची ... ।।८।।
                                  - रोहन जयवंत घाडगे 

Tuesday, 4 September 2018

शिक्षक - समाजाचा आधारस्तंभ

ज्ञानाचा हा लख्ख प्रकाश ,
सोन्या हून हि पिवळा हा प्रकाश ;
उजळुनी काढत आहे तो ,
समाजातील विस्तृत घटकांचा आभाव .
कोण आहे तो ? ज्याने घेतला आहे हा ध्यास ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!१!!
गुंतत चालला आहे समाज ,
अर्थव्यवस्थेच्या या खोल डोहात ;
तो करीत आहे प्रयास ,
काढण्यास गाळातून बाहेर हा समाज .
कोण आहे तो ? जो करीत आहे हा प्रयास ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!२!!
दुःख असो वा सुख ,
चेहरा तुझा हा सदा हसरा ;
न दिसे तुझ्या चेहऱ्यावरती कामाचा तनाव ,
न दिसे तुझ्या चेहऱ्यावरती कधी हि निराशा ;
तुला तर पहायचे आहे फक्त ,
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा भाव .
कोण आहे तो ? ज्याने ठरवलं आहे हे मनाशी ठाम ;
हाच तो समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!३!!
मूर्तीकार जसा निर्जीव शिळेला ,
आकार देऊन मूर्ती बनवतो ;
तसं शिक्षक सजीव जीवाला ,
ज्ञानरूपी आकार देऊन ,
ज्ञानप्रविष्ठ बनवतो .
कोण आहे तो ? जो विद्यार्थ्यांना बनवत आहे ज्ञानप्रविष्ठ ,
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!४!!
विद्यार्थ्यांना या ज्ञानाच्या गंगेत नेवून ,
विद्यार्थ्याला या समाजात ताठमानेने ;
जगण्याची इर्षा देणारा ,
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये स्वतःचे यश बघणारा ;
परंतु स्वतःच्या कर्तृत्वाचे जराही बिरुद न मिरवणारा .
कोण आहे तो ? ज्याला नाही कोणत्याही इर्षेची हाव ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!५!!
शिखरावरती चमकणाऱ्या तेजस्वी दीपाला ,
स्वतःच्या पाठीचा कणा सरळ होई पर्यंत ;
मार्गदर्शनाची रास लावणारा ,
विद्यार्थ्यांच्या सुखात अन दुःखात ;
विद्यार्थ्यांला येणाऱ्या अडीअडचनीच्या काळात ,
विद्यार्थ्यांची सावली बनून उभा राहणारा ;
परंतु स्वतः कधीही प्रकाश झोतात न येणारा .
कोण आहे तो ? जो सज्ज आहे करण्यास असे अविष्कार ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!६!!
     
                                     - रोहन जयवंत घाडगे 

Saturday, 25 August 2018

सर्वाना बहिण मात्र असावी


मनात उठलं आहे
तुझ्या विचाराचं काहूर
परंतु का कोणास ठावूक
माझ्याच मनात आहे,
कोणत्या तरी दडपणाची हुरहूर !!
मराठी मध्ये बहिण
इंग्रजी मध्ये सिस्टर
हिंदी मध्ये बहन
संस्कृत मध्ये भगिनी
तुला समजण्याच्या कल्पना अनेक
पण तुझ रूप मात्र एक.
म्हणूनच असं वाटते, सर्वाना बहिण मात्र असावी !!१!!
तुला प्रेमानं म्हणावं दिदू
आदरान म्हणावं दीदी
आलाच क्वचित राग तर म्हणावं दिडये
अन हल्लीच्या मोडर्ण मध्ये म्हणावं दि,
तुझ्याशी बोलण्याच्या परिभाषा अनेक
पण नातं मात्र एक.
म्हणूनच असं वाटते, सर्वाना बहिण मात्र असावी !!२!!
भावा-बहिणीच नात जपणारी
त्याच नात्याची रेशमी दोर तयार करणारी
काही चुकलं तर रागावणारी
पण क्षणार्धात विरघळून जावून
केलेल्या चुकांना सुधारण्याची
संधी देवून माफ करणारी.
म्हणूनच असं वाटते, सर्वाना बहिण मात्र असावी !!३!!
मन कवड्या मनाची
अन मोकळ्या स्वभावाची
माझ्या मनातल्या गोष्टी समजून घेणारी
अन तिच्या मनातल्या
गोष्टी बिनधास्त सांगणारी.
म्हणूनच असं वाटते,सर्वाना बहिण मात्र असावी !!४!!
का रे देवा? तुला सापडून सापडलो का मीच का
न मला बहिणीचा सहवास दिलास,
न दिलीस मला तू तिची माया.
कशी असेल रे देवा? तिची माया
अशीच का? ज्याची जाणवते,
मला ऊणीव आता.
म्हणूनच असं वाटते, सर्वाना बहिण मात्र असावी  !!५!!

                       - रोहन जयवंत घाडगे