Tuesday, 4 September 2018

शिक्षक - समाजाचा आधारस्तंभ

ज्ञानाचा हा लख्ख प्रकाश ,
सोन्या हून हि पिवळा हा प्रकाश ;
उजळुनी काढत आहे तो ,
समाजातील विस्तृत घटकांचा आभाव .
कोण आहे तो ? ज्याने घेतला आहे हा ध्यास ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!१!!
गुंतत चालला आहे समाज ,
अर्थव्यवस्थेच्या या खोल डोहात ;
तो करीत आहे प्रयास ,
काढण्यास गाळातून बाहेर हा समाज .
कोण आहे तो ? जो करीत आहे हा प्रयास ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!२!!
दुःख असो वा सुख ,
चेहरा तुझा हा सदा हसरा ;
न दिसे तुझ्या चेहऱ्यावरती कामाचा तनाव ,
न दिसे तुझ्या चेहऱ्यावरती कधी हि निराशा ;
तुला तर पहायचे आहे फक्त ,
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा भाव .
कोण आहे तो ? ज्याने ठरवलं आहे हे मनाशी ठाम ;
हाच तो समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!३!!
मूर्तीकार जसा निर्जीव शिळेला ,
आकार देऊन मूर्ती बनवतो ;
तसं शिक्षक सजीव जीवाला ,
ज्ञानरूपी आकार देऊन ,
ज्ञानप्रविष्ठ बनवतो .
कोण आहे तो ? जो विद्यार्थ्यांना बनवत आहे ज्ञानप्रविष्ठ ,
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!४!!
विद्यार्थ्यांना या ज्ञानाच्या गंगेत नेवून ,
विद्यार्थ्याला या समाजात ताठमानेने ;
जगण्याची इर्षा देणारा ,
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये स्वतःचे यश बघणारा ;
परंतु स्वतःच्या कर्तृत्वाचे जराही बिरुद न मिरवणारा .
कोण आहे तो ? ज्याला नाही कोणत्याही इर्षेची हाव ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!५!!
शिखरावरती चमकणाऱ्या तेजस्वी दीपाला ,
स्वतःच्या पाठीचा कणा सरळ होई पर्यंत ;
मार्गदर्शनाची रास लावणारा ,
विद्यार्थ्यांच्या सुखात अन दुःखात ;
विद्यार्थ्यांला येणाऱ्या अडीअडचनीच्या काळात ,
विद्यार्थ्यांची सावली बनून उभा राहणारा ;
परंतु स्वतः कधीही प्रकाश झोतात न येणारा .
कोण आहे तो ? जो सज्ज आहे करण्यास असे अविष्कार ;
हाच तो , समाजाचा आधारस्तंभ शिक्षक !!६!!
     
                                     - रोहन जयवंत घाडगे