आस या निसर्गाला
प्रदूषण विरहित पर्यावरणाची
अन भीती त्यांना
फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू अन ध्वनी प्रदूषणाची ....
आस या चांदण्याना
स्वतःच्या अस्तित्वाची
अन भीती त्यांना
झगमगत्या विद्युत प्रकाश्यात लुप्त होण्याची ....
आस गढ-कोठांना
स्वतःच्या अस्तित्वाची
अन भीती त्यांना
त्यांच्या होणाऱ्या पडझडीची अन इतिहासाच्या पानात लुप्त होण्याची ....
आस या वन्य प्राणी- पक्षी वेलींना
स्वतःच्या अस्तित्वाची
अन भीती त्यांना
जंगलामध्ये मनुष्याचा होणाऱ्या सततच्या हल्यात लुप्त होण्याची ....
आस मला
सर्वांनी आपापली जबाबदारी स्वीकारण्याची
अन आपण सर्वांनी मिळुन
पर्यावरण पुरक निसर्गाकडे वाटचाल करण्याची ....
- रोहन जयवंत घाडगे